शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शीतल म्हात्रेंना समर्थन देत तू लढ आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत, असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.